Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 23-Mar-2010
Description: Pati @ Kanchan Galli, Law College Road
English Translation: No Parking, no pissing & no dogs do etc.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (27 votes cast)


 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
पंक्चर आणि शॉक अब्सॉर्बर या दोन शब्दाना अशुद्ध लेखनाचा शाप प्राप्त झालेला आहे..कधीही कुठेही पहा...हे २ शब्द तुम्हाला शुद्ध लिहिलेले दिसणार नाहीत...शीला ताईंनी देखील तोच कित्ता गिरविला आहे.
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
कुत्र्यांची घाण करू नये म्हणजे नक्की काय?

कुत्र्यानी घाण करू नये हे वाक्य कदाचित व्याकरण द्रुष्ट्या श्रेष्ठ ठरले असते पण अनुकरण द्रुष्ट्या व्यर्थ राहीले असते...

बर कुत्र्यांचीच घाण तुम्ही करू नये असा अन्वय लावावा तर ते कसे बरे शक्य होईल?

एअकंदरीतच शीला ताईंना परत एकदा आपल्या बंड्याच्या शाळेत जाऊन मराठी शुद्धलेखन शिकण्याची गरज आहे असे अम्हांस वाटते...
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
नीट पहा!!! पाटीच्या बरोब्बर खालीच एक गाडी लावलेली दिसत आहे!!!

का ती प्रणव जतकरांची आहे?
 
On 31-Mar-2010 , Pranav Jatkar said,
वा प्रशांतजी, तुमच्यामुळे या साईटला जागती ठेवण्यास फार मदत होते हे मला सांगण्यास आपण भाग पाडलेत. वस्तुतः एक पुणेकर या नात्याने दुसर्या पुणेकराचे कौतुक करण्याचे मी टाळत होतो. काय करणार अस्तित्वाचा प्रश्न आहे ना...!
 
On 31-Mar-2010 , Pranav Jatkar said,
राहता राहिला प्रश्न या गाडीचा.. होय हा माझ्याच गाडीचा आरसा आहे. काय करणार? बहुतेक पाट्यांचे फोटो गाडीवर बसुनच काढलेले परवडतात. न जाणो कुठुन त्या पाटीचा मालक मारायला आला तर पळ काढायला बरं...!
 
On 06-Apr-2010 , ankush said, Star Poster
गाडी लावाल तर गाडी पंचर (नमुना बघा फोटोत), इतर काही केले ऊ. लघवी, कचरा, घाण, ह्यासाठी सुद्दा शिक्षा आहे - पंचर ! कठीण् आद्न्य़ा आहे ही.
 
On 06-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
खरय जतकर साहेब...मी या शीला बाईला लोकांच्या अंगावर कुत्र्य़ाप्रमाणे वसा वसा खेकसत जाताना नैकदा पाहिलेले आहे...खरे तर यांचे घर इअतके आड बाहजुला आहे...२-४ गाड्या जास्त लागल्या तर काय बिघडते हेच मला कळत नाही...बरे हिच्या हॉटेलात देखील मी कधीही एकही इसम बसलेला पाहिलेला नाही...तरिही फुकटच माज...माज्ह्या मते ही एक जाहिरात करायची पद्धत असावी...
 
On 22-Apr-2010 , Kesu said, Star Poster
कमाल आहे, शीला विहारात लघवी करण्यास मनाई? बरं शीला विहारात 'शी'ला तरी मनाई नाही ना?
 
On 23-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
हा हा हा!!! केसुजींची प्रतिभा कुठे आणि क"शी" बहरेल याचा काही नेम नाही बुवा!
 
On 23-Apr-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
हा खासगी रस्ता आहे का? कुत्र्यांची घाण करु नये म्हणजे काय बुवा? चुकले. काय शीला बाई? का इथे कुत्र्यांव्यतिरीक्त इतर प्राणी सुद्धा तंगडी वर करुन घाण करतात.
 
On 23-Apr-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
त्यापेक्षा एक लोकोपयोगी काम करा. इथे एक शी विहार बांधुन द्या. पाहिजे तर त्यावर पाटी लावा "शीला विहार पुरस्कृत शी विहार" लोक दुवा देतील व तुमचा शीला विहारातील विहार सुसह्य होईल.
 
On 04-May-2010 , ash said,
sheela shi...la jaun yee
 
On 13-May-2010 , Kshitij Desai said,
ही साईट खरोखर सुंदर उपक्रम आहे. या पाट्या मस्त करमणूक करतातच, शिवाय Vijaydatta Oak, prashant balkrishna kulkarni, Kesu यांच्या कॉमेंट्स त्याला चार चाँद लावतात.
 
On 16-Jun-2010 , ankush said, Star Poster
...कुत्र्यांची घाण करू नये ...
ह्या सुचनेवर वाद (विवाद नाही) झालेला दिसतो.
पाटी मानव वाचकांसाठीच लिहलेली आहे. तसे नसते तर, म्हणजे मानव व कुत्री ह्या दोघा प्राण्यांना सबोंधुन लिहली असती. मग ते वाक्य बदलेले असते.
उदा. ...तसेच, कुत्र्यांनी घाण करू नये ...
(वाचता येते येत नाही हा वेगळा प्रश्न)
पण तसे काही नाहि. मग वाटते की नाही फक्त मानव वर्गाला सुचना दिल्या जातात. मग आता, प्रश्न असा पडतो की "कुत्र्यांची घाण" मानव कसे करतील? शीलाजींना हे तर अपेक्षित नाही ना की मासांहारी लोक कुत्र्यांचे भक्षण करुन हाडे,तंगडी ईकडे टाकतात? ई.
 
On 26-Jul-2010 , Santosh Takale said,
काय करावे या पुनेकराना
 
On 28-Jul-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
शीला ताई माफ करा पण माझा कुत्रा साक्षर नाही...ये रे मोती...पुरे हा आता!
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
kiti ti niyamavali??
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required